Tuesday, 15 September 2020

बुद्धिबळ-जगातील सर्वात सुंदर खेळ

 नमस्कार बालमित्रांनो, 

लेख लिहिण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न... आणि तो खास तुमच्यासाठी करत आहे 


 *माझा विषय आहे  : बुद्धिबळ-जगातील सर्वात सुंदर खेळ * 


    होय... बुद्धिबळ खरंच खूप सुंदर खेळ आहे.


मला लहानपणापासून च ह्या खेळाविषयी आवड निर्माण झाली. मी लहान असतांना फार स्पर्धा काही होतं नसतं किंवा कदाचीत मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडिया नसल्याने मला माहिती मिळतं नसेल,  त्यामुळे हवे तसें यश लहानपणी नाही मिळवू शकलो.

लहानपणी खेळलेला आणि आवड असलेला खेळ इतका जगप्रसिद्ध आणि सार्वधिक खेळला जाणारा खेळ आहे हे मला मोठा झाल्यावर कळले. मी जिद्द आणि चिकाटी ठेवत पुन्हा अभ्यास केला व पुन्हा खेळायला सुरुवात केली आणि आंतरराष्ट्रीय मानांकन मिळविले,  शिवाय राज्य बुद्धिबळ संघटनेकडून आयोजित महाराष्ट्र राज्य प्रमाणित पंच परीक्षा उत्तीर्ण होऊन विविध स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम सुरु केले.

बुद्धिबळ खेळल्यामुळे बुद्धीचा योग्य रित्या वापर तर होतोच,  शिवाय कुशाग्र बुद्धी तयार होते. जशी तलवार अधिकाधिक वापरल्यामुळे धारदार होतं जाते अगदी त्याप्रमाणे बुद्धी ला सुद्धा धार निर्माण होते, आणि तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी सहज लक्षात ठेवू शकतात,  ज्याचा उपयोग अभ्यासासोबतच दैनंदिन व्यवहार करण्यात देखील होतो.

बुद्धिबळ जे मुलं नियमित खेळतात त्यांची आकलन शक्ती (म्हणजे कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची शक्ती ) इतरांपेक्षा अधिक असते.

Analytical skills (विश्लेषण कौशल्य ) देखील चांगल्या प्रकारे निर्माण होतात,  problem-solving-skills ( अडचणींवर मात करण्याचे तंत्र ),  जिद्द आणि चिकाटी वाढणे इत्यादी नानाविध फायदे बुद्धिबळ खेळल्याने होतं असतात.

शिवाय बुद्धिबळाच्या विविध स्तरांवर नियमित स्पर्धा होतं असतात,  त्यात भाग घेऊन यश संपादन केल्यास तुमचा आत्मविश्वास दृढ होण्यास निश्चित मदत होते. मला ठाऊक असलेल्या विविध स्पर्धा म्हणजे निरनिराळ्या लोकल टूर्नामेंटस,  जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा,  महापौर चषक, राज्य निवड चाचणी स्पर्धा,  राष्ट्रीय बुद्धिबळ निवड स्पर्धा,  आशियाई स्पर्धा,  जागतीक वयोगटातील स्पर्धा आणि आंतर राष्ट्रीय मानांकन स्पर्धा.

and Most importantly - It develops winning attitude from early childhood.

काय मग,  इतकं सारं कळल्यावर तरी करणार ना सुरुवात बुद्धिबळ खेळायला? 



प्रदिप पाटे, पुणे. ( Prerana Chess Academy )

बुद्धिबळ प्रशिक्षक, (AICF Certified Trainer)

महाराष्ट्र राज्य प्रमाणित पंच, (AMCA Certified Chess Arbiter)

आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू  (International FIDE Rated Chess Player)

संपर्क : 8007390399

No comments:

Post a Comment

Republic Day Special - One Day Rapid Chess Tournaments

Prerana Chess Academy, Pimple Saudagar, Pune on occasion of 77  th Republic Day of India, 26th January 2026  is organizing age category tour...